ट्रेंडिंग

IPL NEWS 2024 : रोहित आता मुंबईतून नाही धोनीच्या चेन्नईतून खेळणार ? चेन्नईच्या संघाकडून मोठं वक्तव्य, मुंबईच्या ताफ्यात खळबळ..!

Rohit Sharma Future After IPL Auction 2024 : इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2024 साठी मिनी लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये पार पडला. आता आयपीएलच्या सीझनची (IPL 2024) तयारी सुरू झाली आहे. आयपीएलचा आगामी सीझन मार्च ते मे दरम्यान खेळवला जाऊ शकतो, असा अंदाज सध्या व्यक्त केला जात आहे. यंदाचा आयपीएल सीझन अनेक वादग्रस्त गोष्टींमुळे चर्चेत आहे. त्यापैकी एक म्हणजे, मुंबई इंडियन्सला (Mumbai Indians) 5 वेळा चॅम्पियन बनवणारा माजी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधार पदावरुन हटवणं आणि त्याच्याऐवजी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) कर्णधार पद सोपवणं. IPL NEWS 2024

एलआयसीकडून कर्जासाठी पात्रता

मुंबई फ्रँचायझीनं अलीकडेच रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याला कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. अशा स्थितीत ट्रेड विंडोदरम्यान रोहित मुंबईचा संघ सोडणार का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दरम्यान, काही चाहते आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये असंही म्हटलं आहे की, रोहित ट्रेड विंडो अंतर्गत चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात जाऊ शकतो. आता काय खरं? आणि काय खोटं? याबाबत मात्र रोहित शर्माकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही. अशातच याबाबत चेन्नई सुपर किंग्सकडून (Chennai Super Kings) मात्र स्पष्टीकरणं देण्यात आलं आहे.

लेक लाडकी योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणे

इथे क्लिक करा

चेन्नईचं रोहितबाबत मोठं वक्तव्य, चर्चांना उधाण

चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या खांद्यावर चेन्नईची संपूर्ण धुरा आहे. अशातच आयपीएलच्या इतिहासातीस सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेला रोहित शर्माही धोनीच्या ताफ्यात सामील होणार म्हटल्यावर अलभ्य लाभ, अशा चर्चा सुरू आहेत. अशातच यावर चेन्नई सुपर किंग्सकडून मोठं वक्तव्य करण्यात आलं आहे. रोहित शर्मा चेन्नईच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याच्या सर्व चर्चा चेन्नईच्या संघ प्रशासनानं फेटाळून लावल्या आहेत. फ्रँचायझीचे सीईओ कासी विश्वनाथन यांनी लिलावाच्या वेळी बोलताना सांगितलं की, त्यांची टीम रोहितला घेण्याच्या मूडमध्ये नाही. या सर्व बातम्या अफवा आहेत. IPL NEWS 2024

विश्वनाथन पुढे बोलताना म्हणाले की, “मुख्यतः आम्ही खेळाडूंचा व्यापार करत नाही आणि आमच्याकडे मुंबई इंडियन्ससोबत व्यापार करण्यासाठी खेळाडूही नाहीत. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला नाही आणि आमचा तसा कुठलाही हेतू नाही. चेन्नई संघ एमआय खेळाडूंचा व्यापार करू पाहत असल्याच्या मीडियामधील चर्चांचंही त्यांनी यावेळी खंडन केलं आहे.

रोहित, सूर्या आणि बुमराह मुंबईच्याच ताफ्यात

मुंबई इंडियन्सशी संबंधित एका अधिकाऱ्यानं ‘क्रिकबझ’ वेबसाईटशी बोलताना सांगितलं की, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांच्याबाबत काही अनावश्यक चर्चा सध्या सुरू आहेत. पण महत्त्वाची बातमी म्हणजे, ते कुठेही जात नसून मुंबई इंडियन्स या सर्व खेळाडूंनासोबत ठेवणार आहे. तसेच, पुढे बोलताना या अधिकाऱ्यानं आणखी एक महत्त्वाच्या गोष्टीवर वक्तव्य केलं. ते म्हणाले की, आगामी आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाची धुरा हार्दिक पांड्याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याचा निर्णय घेण्यापूर्वी, सर्व खेळाडूंची संमती घेण्यात आली होती. ज्यामध्ये स्वतः रोहित शर्माचाही समावेश होता. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सर्व चर्चा निराधार आहेत. प्रत्येक खेळाडूनं हा निर्णय मान्य केला आहे.

रोहितच्या कामगिरीत घसरण

2013 पासून मुंबईचे कर्णधारपद भूषवत रोहितनं मुंबई इंडियन्सला 5 वेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं आहे. आयपीएलच्या गेल्या दोन हंगामात रोहितचा फॉर्म खूपच खराब राहिला आहे. रोहितनं 2023 IPL मध्ये 16 सामन्यात 20.75 च्या सरासरीनं आणि 132.80 च्या स्ट्राईक रेटनं 332 धावा केल्या. 2022 मध्ये, त्यानं 14 सामन्यांमध्ये 19.14 च्या सरासरीनं आणि 120.18 च्या स्ट्राइक रेटनं 268 धावा केल्या. रोहितच्या फॉर्ममध्ये सरासरीच्या बाबतीत निश्चित घसरण झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button