ट्रेंडिंगतंत्रज्ञानसामाजिक

Monsoon Update : अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा , जाणून घ्या या आठवड्यात हवामानाची स्थिती.

Maharashtra Monsoon News : येत्या २४ तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहील. Monsoon Update

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होत असल्याने हवामानात वारंवार बदल होत आहेत. राज्यात ऊन आणि पावसाची लपाछपी सुरूच आहे. काही जिल्ह्यांमध्ये कडक उष्मा आहे, तर काही ठिकाणी वादळी वाऱ्याने आणि पावसाने कहर केला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) देखील नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

पंजाबराव डख यांचे हवामानविषयक अंदाज येथूनच जाणुन घ्या !

Monsoon Update : केरळमध्ये मान्सूनच्या (Kerala Monsoon Onset) प्रवेशाबाबत, आयएमडीने सांगितले की, परिस्थिती अनुकूल राहण्याची शक्यता आहे. मात्र, केरळमध्ये मान्सून कधी सुरू होईल, त्याची नेमकी तारीख अद्याप सांगता येणार नाही. आम्ही निरीक्षण करत आहोत आणि सोमवारी याबाबत अपडेट जारी करू. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) येत्या आठवड्यात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळ आणि पावसाचा इशारा दिला आहे.

घरबसल्या करा व्यवसाय, कंपनी देणार मशिन आणि तयार केलेला माल सुद्धा कंपनी विकत घेणार! महिन्याला सहज 50 ते 60 हजार कमावू शकता.

येत्या २४ तासांत मुंबईसह अनेक उपनगरांमध्ये संध्याकाळी किंवा रात्री हलका पाऊस पडण्याची शक्यता असून आकाश ढगाळ राहील, अशी शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या काळात कमाल आणि किमान तापमान 34 ते 28 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर ठाणे आणि पालघरमध्येही वादळी पावसाची शक्यता आहे.

Mumbai Monsoon Update

धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, वाशीम, यवतमाळ, वर्धा, अमरावती जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. या दरम्यान, वारा 30-40 किमी प्रतितास वेगाने वाहण्याची अपेक्षा आहे तर हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. तर आज धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, औरंगाबाद येथे विविध ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

ज्यांना कर्ज घ्यायचे आहे त्यांना आता ही बँक 2 लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज कोणत्याही अडचणीशिवाय देणार आहे.

मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मात्र, विदर्भात 6 ते 8 जून दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील अनेक भागात पुढील २४ तासांत ढगांच्या गडगडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार विदर्भातील अमरावती, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button