सरकारी योजना

गिव्ह इट अप योजना काय आहे ? ह्या योजनेचा लाभ काय आहे ? Maharashtra Government Give it up scheme Information in Marathi

महाराष्ट्र राज्यात प्रथमतच शासकीय योजनेचा लाभ परत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गिव्ह इट अप Give it up scheme ही योजना सुरू केली आहे. सरकारने सुरू केलेल्या ह्या नवीन योजनेमुळे अपात्र लाभार्थीना सरकारी योजनांचा प्राप्त होत असलेला लाभ परत करता येणार आहे. सरकारच्या वतीने लाभ परत करण्यासाठी प्रथमतच हा पर्याय उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महाडिबीटी ह्या पोर्टलवर गिव्ह इट अप हा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला आजच सबस्क्राईब करा

सध्याच्या स्थितीत सरकारच्या एकुण ६५ योजनांसाठी हा पर्याय लाभार्थ्यांना शासनाकडून प्राप्त होईल.

असे करून भारत देशात गिव्ह इट अप योजना लागु करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

गिव्ह इट अप ह्या योजनेसंबंधित एक जीआर ३ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

जे व्यक्ती आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी देखील त्यांना शासकीय योजनांचा लाभ प्राप्त होतो आहे अशा व्यक्तींना आपला लाभ परत करण्यासाठी एक पर्याय उपलब्ध करून दिला जावा.

अशी मागणी भाजप आमदार श्रीकांत भारती यांनी केली होती.

यानंतर सामान्य प्रशासनाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्यात गिव्ह इट अप ही योजना सुरू केली गेली आहे.

गिव्ह इट अप योजनेचा फायदा काय आहे ?

ह्या कल्याणकारी योजनेमुळे जे भारतीय नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांना प्राप्त होत असलेल्या शासकीय योजनांचा लाभ ह्या गिव्ह इट अप पर्यायामुळे नाकारता येईल.

गिव्ह इट अप ह्या योजनेमुळे जे भारतीय नागरिक अपात्र आहेत त्यांना शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहता येईल.

शासनाच्या विविध योजनांद्वारे डिबीटी अनुदानासाठी पात्र झालेल्या लाभार्थींना ह्या गिव्ह इट अप ह्या पर्यायामुळे शासनाला आपल्याला प्राप्त होत असलेले अनुदान दान करता येईल.

अपात्र लाभार्थीना प्राप्त होत असलेले अनुदान नाकारता येईल शासनास परत करता येईल.

गिव्ह इट अप ह्या पर्यायामुळे शासनाकडून लाभ दिल्या जात असलेल्या कोणत्या योजनेचा स्वीकार करायचा अणि कोणत्या योजनेचा स्वीकार नाही करायचा हे ठरविण्याचा अधिकार लाभार्थींना प्राप्त होईल.

शासनाकडुन योजनेचा लाभ घेण्यासाठी कुठल्याही लाभार्थींला बळजबरी करता येणार नाही.

जे भारतीय नागरिक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत तरी देखील अणि पात्रता नसतानाही त्यांना सरकारी योजनांचा लाभ दिला जातो आहे

अशा अपात्र लाभार्थ्यांना प्राप्त होत असलेला लाभ ह्या योजनेमुळे परत करता येईल.

गिव्ह इट अप ह्या पर्यायामुळे शासनाकडून दिल्या जात असलेल्या निधीचा वापर अधिक प्रभावीपणे न्यायपणे होईल.

योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या असक्षम असलेल्या भारतीय नागरिकांना अधिकतम प्रमाणात सरकारी योजनांचा लाभ प्राप्त करता येईल.

अणि जे व्यक्ती खरच गरजवंत आहेत त्यांना शासकीय लाभ प्राप्त होतील.

गिव्ह इट अप योजनेमुळे जे भारतीय नागरिक सधन आहेत त्यांना योजनेचा लाभ गिव्ह इट अप करता येईल

यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना २०२४ विषयी माहिती

गिव्ह इट अप योजनेची अंमलबजावणी कशी करण्यात येईल?

Give it up scheme योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी महाडिबीटी ह्या पोर्टलवर गिव्ह इट अप नावाचा एक पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल.

यानंतर जेव्हाही संबंधित योजनेकरीता अर्ज करावयास आरंभ होईल तेव्हा त्या अर्जदार व्यक्तीला हा गिव्ह इट अप पर्याय निवडता येईल.

जे लाभार्थीं गिव्ह इट अप हा पर्याय निवडतील त्यांना शासनाकडून प्राप्त होत असलेल्या योजनेचा लाभ नाकारण्यासाठी एक ओटीपी प्रविष्ट करण्यास सांगितले जाईल.

हा ओटीपी प्रविष्ट केल्यानंतर अर्जदार लाभार्थीं व्यक्ती योजनेचा लाभ नाकारला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button