Maharashtra Berojgari Bhatta Yojana महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना २०२४ विषयी माहिती
आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतेक तरूण हे आज सुशिक्षित आहेत पण नोकरीच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नसल्याने त्यांना बेरोजगारीला सामोरे जावे लागत आहे.त्यातच आपल्या महाराष्ट्र राज्यातील बहुतांश तरूण हे गरीब कुटुंबातील आहेत त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने ते स्वताचा उद्योग व्यवसाय देखील सुरू करू शकत नसतात. त्यातच घरातील कर्ता पुरुष असल्याने घरातील सर्व आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असते.अणि जवळ नोकरी तसेच रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने तरुणांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते.म्हणून महाराष्ट्र राज्यातील अशा गरीब कुटुंबातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता Berojgari Bhatta ही योजना महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविण्यात येत आहे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना काय आहे?
ही महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना नोकरी प्राप्त होईपर्यंत आपला उदरनिर्वाह करता यावा यासाठी त्यांना आर्थिक मदत प्राप्त करून देण्यासाठी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेली एक महत्वाची योजना आहे.
बेरोजगारी भत्ता योजनेची सुरूवात २०२० मध्ये करण्यात आली होती.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभार्थी कोण आहेत?
राज्यातील सर्व गरीब कुटुंबातील अद्याप नोकरी प्राप्त न झालेले २० ते ३५ ह्या वयोगटातील सुशिक्षित बेरोजगार तरूण ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –
योजनेच्या अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील नोकरी प्राप्त न झालेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जो पर्यंत त्यांना नोकरी मिळत नाही.
तोपर्यंत शासनाच्या वतीने दरमहा पाच हजार रुपये इतके बेरोजगारी भत्याच्या स्वरूपात आर्थिक साहाय्य केले जाते.
जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध होईपर्यंत आपल्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवता येईल.
त्यांना आपल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे?
राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना जोपर्यंत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य ती नोकरी प्राप्त होत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचा दैनंदिन जीवनातील आवश्यक खर्च नोकरी शोधण्यासाठी लागणारा खर्च भागवता यावा यासाठी त्यांना आर्थिक मदत करणे हा महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचा मुख्य हेतु आहे.
महाराष्ट्र राज्यातील तरूणांपुढे असलेले बेरोजगारीचे संकट दुर करण्यासाठी तसेच त्यांना शासनाच्या वतीने आर्थिक साहाय्य प्राप्त करून देण्यासाठी ही योजना सुरू केली आहे.
बेरोजगार तरूणांवरील आर्थिक खर्चाचा भार कमी करणे त्यांना नोकरीच्या संधी शोधण्यासाठी आर्थिक साहाय्य करणे,बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करून त्यांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास घडवून आणने,त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणने,त्यांना आत्मनिर्भर तसेच सक्षम बनवणे हे ह्या महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट आहे.
जवळ रोजगाराचे कुठलेही साधन नसल्याने तरुणांना ज्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे त्यापासून त्यांची मुक्तता करणे हे देखील ह्या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना विषयी माहिती
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे वैशिष्ट्य –
Berojgari Bhatta योजना ही महाराष्ट्र सरकारने राज्यातील बेरोजगार तरुणांना आर्थिक साहाय्य प्रदान करण्यासाठी सुरू केली आहे.
ह्या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना खुप मोठा आर्थिक आधार प्राप्त होणार आहे.
राज्यातील बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर सक्षम बनवण्यास ही योजना महत्वाची भुमिका पार पाडणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या ह्या योजनेमुळे बेरोजगार तरुणांना नोकरी प्राप्त होत नाही तोपर्यंत स्वताचा खर्च भागविण्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही किंवा आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी कोणाकडून उसणे पैसे देखील घेण्याची त्यांना आवश्यकता असणार नाही.
राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना आपल्या पात्रतेनुसार योग्य ती नोकरी प्राप्त नाही तोपर्यंत त्यांना शासनाकडून दरमहा आई आर्थिक साहाय्य दिले जाईल.
योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम लाभार्थींच्या थेट बँक खात्यात जमा केली जाते.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करायला तरूणांना कुठल्याही शासकीय कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत नाही तरूणांना घरबसल्या आपल्या मोबाईल दवारे आॅनलाईन अर्ज करता येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?
लाभार्थी तरूण हा बेरोजगार असणे आवश्यक आहे.
तरूण महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.
लाभ घेण्यासाठी ठेवण्यात आलेले नियम अटी –
महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील तरूणांना दिला जाणार आहे.महाराष्ट राज्याच्या बाहेरचे बेरोजगार तरूण ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकत नाही.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असलेल्या व्यक्तीकडे उत्पन्नाचे कुठलेही साधन नसावे.
अर्जदाराचे वय १८ ते ३५ ह्या वयोगटातील असणे आवश्यक आहे.
लाभार्थींचे नाव इम्पलाॅईमेंट आॅफिस मध्ये नोंदलेले असणे आवश्यक आहे.
अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा जास्त असु नये.
किमान बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
अर्जदार कोणत्याही खासगी तसेच सरकारी क्षेत्रात काम करत नसावा.
बॅकेत खाते असावे अणि ते खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेअंतर्गत नोंदणी कशी करायची?
योजनेसाठी रेजिस्ट्रेशन करण्यासाठी आपणास सर्वप्रथम rojgar.mahaswayam.gov.in ह्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
अधिकृत संकेतस्थळावर गेल्यावर होमपेजवर आपणास लाॅग इनचा पर्याय दिसुन येईल.
लाॅग इन वर क्लिक केल्यावर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल.
तिथे आपल्याला विचारलेली सर्व वैयक्तीक माहिती भरून घ्यायची आहे.माहीती भरून झाल्यावर नेक्स्ट ह्या बटणावर क्लिक करायचे आहे.
आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी सेंड केला जाईल तो प्रविष्ट करायचा आहे.अणि खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करायचे आहे.
यानंतर आपले योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण होऊन जाईल.
महाराष्ट्र Berojgari Bhatta योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे –
- आधार कार्ड
- मतदान कार्ड
- पॅन कार्ड
- अर्जदार किमान १५ वर्षांपासून महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.त्याच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र देखील असावे.
- जन्म प्रमाणपत्र
- वयाचे प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न दाखला
- १२ वी उत्तीर्ण सर्टिफिकेट
- दोन पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर