सरकारी योजना

Rashtriya Vayoshri Yojana राष्ट्रीय वयोश्री योजनेविषयी माहिती

केंद्र सरकार देशातील वृद्ध अणि अपंग व्यक्तींसाठी नेहमी नवनवीन योजना राबवित असते. Rashtriya Vayoshri Yojana ही देखील केंद्र सरकारने सुरू केलेली अशीच एक महत्वाची योजना आहे.

ही एक शासकीय योजना आहे जिच्याअंतर्गत देशातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच अपंग व्यक्तींना मोफत मध्ये विनाशुल्क त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार गरजेनुसार उपयुक्त ठरतील अशी उपकरणे शिबिर आयोजित करून दिली जात असतात.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ज्या ज्येष्ठ नागरिकांना कमी ऐकु येते त्यांना ऐकण्यासाठी श्रवणयंत्र उपलब्ध करून दिले जाते.

तसेच ह्या योजनेअंतर्गत अपंग व्यक्तींना देखील त्यांचा जो काही अपंगत्वाचा प्रकार असेल त्यानुसार उपकरणे उपलब्ध करून देण्यात येतात.

राष्ट्रीय वयोश्री ही योजना सामाजिक कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येत असलेली योजना आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंग व्यक्तीकडे तो ४० टक्के अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांकडे ते देशातील ज्येष्ठ नागरीक असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाने वयाचे ६० ते ६५ वर्ष पूर्ण केले असणे आवश्यक आहे.

लाभ घेण्यासाठी अर्ज करणारी अर्जदार व्यक्ती महाराष्ट् राज्यातील किंवा भारतातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्जदार व्यक्तीकडे बीपीएल राशन कार्ड असायला हवे.

Rashtriya Vayoshri Yojana लागणारी महत्वाची कागदपत्रे –

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • बीपीएल राशन कार्ड
  • रहिवासी पुरावा
  • वयाचा दाखला तसेच ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र कार्ड
  • शारीरिक दृष्ट्या अपंग असल्याचा दाखला
  • दोन पासपोर्ट साईज फोटो
  • मोबाईल नंबर तसेच ईमेल आयडी

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

ह्या शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी तसेच अपंग व्यक्तींनी alimco.in ह्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

किंवा ज्येष्ठ नागरिक तसेच अपंग व्यक्तींना ह्या योजनेसाठी अर्ज करायला आपल्या घराजवळील एखाद्या सीएससी सेंटर मध्ये जावे लागेल अणि योजनेसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागेल.

विद्यार्थ्यांना मोफत मध्ये लॅपटॉप दिला जाणार आहे. Laptop Yojana 2024 

राष्ट्रीय वयोश्री योजनेचे महत्व काय आहे?

महाराष्ट्र राज्यातील असे ज्येष्ठ नागरिक ज्यांना वय अधिक वाढल्यामुळे व्यवस्थीत चालता येत नाही डोळ्याने स्पष्ट दिसत नाही,समोरचा जे काही बोलतो ते स्पष्टपणे ऐकू देखील येत नाही.

वेगवेगळ्या शारीरिक व्याधीने शारीरिक अपंगत्वाने ग्रस्त असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग अपंग व्यक्तींना त्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्याने स्वतासाठी लागत असणारी महत्वाची अत्यावश्यक उपकरणे देखील त्यांना खरेदी करता येत नाही.

अशा गरजु व्यक्तींना ज्येष्ठ नागरिकांना तसेच अपंग व्यक्तींना राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार मोफत उपकरणे देऊन अर्थ साहाय्य प्रदान केले जाते.

महाराष्ट्र राज्यातील जे ज्येष्ठ नागरिक अपंग दिव्यांग व्यक्ती त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना आवश्यक असणारी उपकरणे खरेदी करू शकत नाही अशा व्यक्तींसाठी ही अत्यंत लाभदायी योजना आहे.

राष्ट्रीय वयोश्री योजनेत बीपीएल श्रेणीतील ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक साहाय्य तसेच सहाय्यक जिवंत उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

योजनेसाठी केंद्र सरकार वित्त पुरवठा करत असते.हया योजनेच्या अंमलबजावणीसाठी खर्च केला जाणारा सर्व निधी हा ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी मधुन भरण्यात येत असतो.

ह्या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना तसेच अपंग व्यक्तींना जी काही उपकरणे शिबिर आयोजित करून वाटप केली जातात त्यांची गुणवत्ता देखील चांगली असते.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा लाभ कोणाला घेता येईल?

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील ६० वय पुर्ण झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना वृदध महिला पुरुष तसेच अपंग दिव्यांग व्यक्तींना घेता येईल.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

ह्या योजनेअंतर्गत राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच दिव्यांग अपंग व्यक्तींना त्यांच्या शारीरिक व्याधीनुसार मोफत उपकरणे उपलब्ध करून दिली जातात.

राष्ट्रीय वयोश्री योजनेचा मुख्य हेतु –

महाराष्ट्र राज्यातील जेवढेही आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेले गरीब ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना तसेच राज्यातील सर्व अपंग दिव्यांग व्यक्तींना मोफत मध्ये त्यांच्या आवश्यकतेनुसार उपकरणे देणे.

देशातील वृद्ध व्यक्तींच्या ज्येष्ठ नागरिकांच्या दिव्यांग अपंग व्यक्तींच्या जीवनमानात सुधारणा करणे.

महाराष्ट्र राज्यातील वृद्ध ज्येष्ठ नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास घडवून आणने त्यांना आत्मनिर्भर सक्षम बनवणे.

ज्येष्ठ नागरिकांना आपल्याला आवश्यकता असलेल्या उपकरणाची खरेदी करण्यासाठी कोणावरही आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची गरज पडु नये कोणाकडुनही पैसे उसणे घेण्याची वेळ त्यांच्यावर येऊ नये.

राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत कोणकोणती उपकरणे दिली जातात?

  • आधार घेऊन चालण्याची काठी
  • व्हील चेअर
  • ऐकण्याचे यंत्र
  • चष्मा
  • कृत्रिम दात
  • हात तसेच पायाच्या कोपरयांना बांधायची पटटी
  • तीन पायी सायकल

ज्येष्ठ नागरिकांच्या शारीरिक व्याधीनुसार इत्यादी उपकरणे दिली जातात.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button