सरकारी योजना

बालसंगोपन योजना माहिती Balsangopan Scheme Information in Marathi

आपले महाराष्ट्र सरकार येथील नागरिकांच्या हितासाठी नियमित प्रयत्नशील असते. देशातील गरीब अनाथ निराधार मुलामुलींसाठी शासनाने आतापर्यंत अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. बालसंगोपण ही महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील अनाथ, निराधार,बेघर लहान मुलांसाठी राबविण्यात येणारी अशीच एक महत्वाची योजना आहे. ही योजना केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या अंतर्गत २००५ मध्ये करण्यात आली होती.ही योजना महिला व बालविकास विभागाच्या वतीने राबविण्यात येते. आजच्या लेखात आपण बालसंगोपन योजना म्हणजे काय ? बालसंगोपन योजना माहिती बालसंगोपन योजनेचे फायदे कोणकोणते आहेत? ह्या योजनेचा लाभ कोणाला दिला जातो इत्यादी सर्व महत्वाच्या बाबींविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत.

बालसंगोपन योजना माहिती काय आहे योजना ?

ही महाराष्ट्र राज्यातील अनाथ,बेघर, निराधार,मतिमंद,बहुविकलांग इत्यादी अशा बालकांच्या कल्याणासाठी सुरू केलेली एक महत्वाची योजना आहे.

बालसंगोपन ही योजना महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात आली आहे.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना विषयी माहिती

योजनेचा लाभ कोणाला दिला जातो?

ह्या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील अनाथ आई किंवा वडील नसतील अशी मुले, तसेच ज्या मुलांना आई आणि वडील दोघेही नाहीये अशी मुले, ज्यांचे दोघेही पालक अपंग आहेत किंवा गंभीर आजार झाल्याने रूग्णालयात भरती झाले आहेत, ज्यांचे पालक मानसिक रुग्ण आहेत अशी मुले.

बेघर,तीव्र मतीमंद असलेली मुले तसेच बहुविकलांग मुले,ज्यांची दोन्ही पालक अपंग आहेत,ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाहीये.

ज्या बालकांना दत्तक घेता येत नाही.एक पालक असलेली मुले,मृत्यू, विभक्ती करण,परित्याग,घटस्फोट,अविवाहित मातृत्व, गंभीर आजार,पालक रूग्णालयात आहे अशा विविध कारणांमुळे विघटीत झालेली एक पालक असलेल्या कुटुंबातील मुलांना ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

बालसंगोपन योजनेचा लाभ कुष्ठरोग रुग्ण असलेल्या तसेच जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैंदींच्या मुलांना देखील प्राप्त होणार आहे.

एचआयव्हीने ग्रस्त असलेल्या तसेच एच आयव्हीने बाधित असलेल्या पालकांच्या मुलांना, शाळेत न जाणाऱ्या बालकामगार मुलांना ह्या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

बालसंगोपन योजनेचा लाभ आतापर्यंत ६० हजारापेक्षा जास्त लाभार्थीं घेत आहेत.पण काही लाभार्थींना ह्या योजनेविषयी माहिती नसल्याने ते आजही ह्या लाभापासून वंचित आहेत.

योजनेअंतर्गत दिला जाणारा लाभ –

बालसंगोपन योजनेअंतर्गत आतापर्यंत बालकांना ११५० रूपये इतके मासिक मानधन देण्यात येत होते पण आता ह्या मानधनाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे.

आता ३१ जानेवारी २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार  ह्या योजनेअंतर्गत मुलांना दरमहा २,२५० रूपये अणि वार्षिक २७ हजार इतके मानधन देण्यात येत आहे.

योजनेअंतर्गत दिली जाणारी लाभाची रक्कम थेट लाभार्थींच्या बॅक खात्यात जमा केली जाते.

बालसंगोपन योजनेअंतर्गत मुलांना किती वर्ष पैसे प्राप्त होतील?

योजनेअंतर्गत लहान बालकांना जोपर्यंत ते अठरा वर्षाचे पुर्ण होत नाहीत तोपर्यंत दरमहा २५०० रूपये दिले जाणार आहेत.

बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कुठे अणि कसा करायचा?

योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आॅनलाईन किंवा आॅफलाईन ह्या दोघे पदधतीने अर्ज करू शकतात.

बालसंगोपन योजनेसाठी आॅनलाईन फाॅम भरण्यासाठी आपणास womenchild.maharashtra.gov in ह्या वेबसाईटवर जाऊन आवश्यक ती माहिती भरून सांगितलेली कागदपत्रे अपलोड करून सबमिट बटणावर क्लिक करत आपला अर्ज सादर करायचा आहे.

याचठिकाणी आपल्याला जर ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आॅफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा असेल तर आपण जिल्हा महिला बालविकास कार्यालयात जाऊन योजनेचा फाॅम घेऊ शकतात.अणि तो भरून त्याला आवश्यक ती कागदपत्रे जोडुन जिल्हा महिला बालविकास कार्यालयात जमा करू शकतात.

बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे कोणकोणती आहेत?

योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास पुढील महत्वाची कागदपत्रे अर्जाला जोडावी लागतात –

 • योजनेच्या अर्जाचा नमुना
 • पालकांचे आधार कार्ड
 • बालकाचे आधार कार्ड
 • बालकाचे बोनाफाईड सर्टिफिकेट, जन्म दाखला
 • राहत्या घरासमोर पालकांसोबत काढलेला एकत्रित कुटुंबाचा फोटो(एकापेक्षा जास्त मुले असल्यास प्रत्येक मुलासोबत वेगवेगळा फोटो
 • रहिवासी प्रमाणपत्र
 • आईवडिलांचा मृत्यू झाला असल्यास त्यांचे मृत्यू प्रमाणपत्र, मृत्यूचा अहवाल
 • आई वडिलांचे बॅक खाते पासबुक
 • वार्षिक उत्पन्न दाखला
 • बालक दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र
 • बालकाचे दोन पासपोर्ट साईज फोटो
 • पालकांचे दोन पासपोर्ट साईज फोटो
 • रेशनकार्ड झेरॉक्स

बालसंगोपन योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रतेच्या अटी कोणकोणत्या आहेत?

लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

लाभार्थींचे वय ० ते १८ दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्जदार योजनेच्या निकषात बसणे अत्यंत आवश्यक आहे.

एकाच कुटुंबातील दोन किंवा जास्त मुलांना देखील ह्या योजनेचा लाभ मिळणार आहे.

आपल्या मीउद्योजक युट्युब चॅनेल ला सबस्क्राईब करा

मी उद्योजक

मी उद्योजकच्या माध्यमातून आम्ही टेक्नॉलॉजी /सामाजिक /उद्योजकीय / सरकारी योजना / शेतीविषयक अद्यावत माहिती तुमच्या पर्यंत पोहचवत असतो. उपडेट साठी जॉईन करा आपल्या जिल्ह्याचा व्हाट्सअँप ग्रुप.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button